सौदी अरेबियाला मागं टाकत रशिया ठरला भारताला तेल पुरवठा करणारा सर्वात मोठा देश

Oil Exports Country
Oil Exports Countryesakal
Summary

युक्रेनसोबतच्या युद्धामुळं पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक व्यापारी निर्बंध लादली आहेत.

नवी दिल्ली : भारताला तेल निर्यातीच्या (Oil Exports) बाबतीत रशियानं (Russia) सौदी अरेबियाला (Saudi Arabia) मागं टाकलंय. आता रशिया भारताला तेल पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश बनलाय. भारताला तेलाचा पुरवठा करणारा इराण (Iran) अजूनही सर्वात मोठा देश आहे.

उद्योगांच्या आकडेवारीनुसार, रशियानं मे महिन्यात भारताला दररोज सुमारे 25 दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा केला. हे भारताच्या एकूण गरजेच्या 16 टक्के आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताला तेल पुरवण्याच्या बाबतीत सौदी अरेबिया आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतीय रिफायनरींना मे महिन्यात रशियाकडून दररोज 8.19 लाख बॅरल तेल मिळालं. कोणत्याही एका महिन्यात तेल मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. भारतीय कंपन्यांना एप्रिलमध्ये दररोज 2.77 लाख बॅरल तेल मिळालं.

Oil Exports Country
श्रीनगरमधील चकमकीत पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

युक्रेनसोबतच्या युद्धामुळं (Russia Ukraine War) पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक व्यापारी निर्बंध लादली. त्यामुळं अनेक देशांनी रशियाकडून तेल खरेदी केलं नाही. याचा फायदा भारतीय कंपन्यांना झाला आणि त्यांनी मे महिन्यात विक्रमी तेल स्वस्त दरात आयात केलं. सर्वसाधारणपणे भारतीय कंपन्या जास्त वाहतूक खर्चामुळं रशियाकडून कमी तेल खरेदी करतात.

Oil Exports Country
बुर्किना फासोमध्ये दहशतवाद्यांनी 55 नागरिकांना मारलं ठार

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लीन एअरच्या (Center for Research on Energy and Clean Air) मते, चीन आता जर्मनीला मागे टाकत रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार बनलाय. केंद्राच्या म्हणण्यानुसार, 24 फेब्रुवारीपासून चीननं (China) रशियाकडून 93 अब्ज युरो (सुमारे $97 अब्ज) तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा खरेदी केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com