
राष्ट्रीय राजधानीला लागून असलेल्या नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ओला चालकाने गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारून गर्भपात करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर आरोपी कॅब चालकाने महिलेला रस्त्याच्या मधोमध गाडीतून खाली सोडले. पीडित महिलेने लिंक्डइन या सोशल साइटवर आपली वेदना व्यक्त केली आहे.