'ओला' चालकाचे पॉर्न पाहून महिलेसमोर हस्तमैथून

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

बंगळूरूः एका 'ओला' चालकाने मोबाईल चालकाने मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहून महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केल्याची घटना येथील जेपी नगरमध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बंगळूरूः एका 'ओला' चालकाने मोबाईल चालकाने मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहून महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केल्याची घटना येथील जेपी नगरमध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एका बावीस वर्षीय महिला प्रवाशाने कुबॉन पार्क पोलिस चौकीमध्ये देवासामोलिया नावाच्या ओला चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला एका खासगी कंपनीत नोकरी करते. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ओला कंपनीच्या मोटारीमध्ये बसली होती. चालकाने त्याच्या शेजारील आरसा प्रवासी महिलेच्या दिशेने फिरवला. आरशामध्ये महिलेला तो पहात होता. मोबाईलवर त्याने पॉर्न व्हिडिओ सुरू करून हस्तमैथून करण्यास सुरवात केली. महिलेने त्याला मोटार थांबविण्यास सांगितल्यानंतर त्याने नकार देत घटनास्थळी सोडले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

संबंधित चालक आमच्या कपंनीत नुकताच सहभागी झाला होता. आम्ही महिला प्रवाशाच्या बाजूने ठामपणे उभे राहून पोलिसांना सहकार्य करणार आहोत, अशी माहिती ओला कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

Web Title: Ola driver played porn video in cab at Bengaluru