Old Age Population : भारतातील या राज्यात महिला आहेत सर्वाधिक दीर्घायुषी, कारण काय?

साठीतील महिला पुरुषांच्या तुलनेत जवळपास दीड वर्ष जास्त जगतात
Old Age Population
Old Age Populationesakal

Old Age Population : भारतातील अनेक भागांत महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त जगतात. संयुक्त राष्ट्राच्या इंडिया एजिंग रिपोर्टनुसार २०२३ मध्ये राजस्थान, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, केरळ, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये ६० वर्षीय महिलांचे आयुर्मान आणखी २० वर्षे जास्त असल्याचे दिसून आले.

रिपोर्टमध्ये करण्यात आला हा दावा

इतके वर्ष जास्त जगतात महिला

रिपोर्टनुसार, ६० वर्षाच्या वयात भारतातला एखादीच व्यक्ती पुढील १८-१९ वर्षे जगण्याचा विचार करू शकतो. मात्र राजस्थान, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, केरळ, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये महिला ६० वर्षांपुढे आणखी १९ वर्षे जगतात. तर पुरुष या तुलनेत १७.५ वर्षे जगतात. म्हणजेच साठीतील महिला पुरुषांच्या तुलनेत जवळपास दीड वर्ष जास्त जगतात.

Old Age Population
Humans Population : चक्क 9 लाख वर्षांपूर्वी नामशेष होणार होता मानव! 1% उरली होती लोकसंख्या, हे होते कारण

रिपोर्टमध्ये असा अंदाज दर्शवण्यात आलाय की २०५० पर्यंत देशातील प्रौढांची संख्या दुप्पट होईल. ज्यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी प्रौढांची संख्या २० टक्के असेल. सध्या ६० वर्षांवरील प्रौढांची लोकसंख्या १३.९ टक्के आहे. हा आकडा २०५० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. जगभरात प्रौढांची लोकसंख्या २२ टक्के असेल.

Old Age Population
Women Boxing Doping : डोपिंगचं जाळं; भारतीय महिला बॉक्सरचं एशियन गेम्स मेडल अन् ऑलिम्पिक कोटाही धोक्यात?

२०२२ मध्ये भारतातील प्रौढांची संख्या १४.९ कोटी आहे. हा आकडा देशातील लोकसंख्येच्या जवळपास १०.५ टक्के आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, २०५० पर्यंत प्रौढांची लोकसंख्येतील टक्केवारी २०.८ टक्के असेल. आणि एकूण लोकसंख्या ३४.७ कोटी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com