खते, बियाण्यांसाठी आंध्रात जुन्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर : आंध्र प्रदेश सरकारने शेतीसाठी लागणारी खते, बियाणे खरेदीसाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिल्याने तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

याउलट महाराष्ट्रात मात्र खत, बियाणे, कीटकनाशक, तणनाशक खरेदीसाठी याच नोटा स्वीकाण्यावर बंदी घालून दुजाभाव केला आहे. खत खरेदीसाठी आंध्र प्रदेश सरकार पुढाकार घेत असेल, तर महाराष्ट्रात हा नियम का लागू केला जात नाही, असा सवाल केला जात आहे.

शेतकऱ्यांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. बंदीचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. बॅंकांमध्ये दिवसभर उभे राहून केवळ दोन हजार रुपयेच हातात मिळत आहेत.

Web Title: old notes for fertilizers in andhra