सामाजिक आयुष्यापासून भारतातील ज्येष्ठ वंचित

वृत्तसंस्था
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : शारीरिक आरोग्याची समस्या असलेल्या वृद्धांची संख्या भारतात 10 टक्केच असली तरी, बहुतांश ज्येष्ठ व्यक्तींना त्यांचे सामाजिक आयुष्य सुरळीत ठेवणे व दैनंदिन गरजा भागविण्याची चिंता असते. 

'आयव्हीएच सिनीअर केअर'ने वेलनेस हेल्थ अँड यू या संस्थेच्या सहकार्याने पाहणी केली. 66 टक्के ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक जीवन व दैनंदिन गरजा भागविणे सर्वांत आव्हानात्मक वाटत असल्याचे आढळले आहे. 'जुग जुग जिएँगे' या उपक्रमाअंतर्गत हा सर्व्हे करण्यात आला.

जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, त्यांच्या गरजांकडे पाहण्याचा त्यांचा व मुलांचा दृष्टिकोन समजावून घेण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला. वयोवृद्ध झालेल्या पालकांच्या गरजा लक्षात घेण्यास मुले अपयशी ठरतात, याकडे या अभ्यास अहवालात लक्ष वेधले आहे. 67 टक्के मुले पालकांपासून वेगळी राहत असल्याचे यातून दिसून आले. अशा पालकांमध्ये आरोग्य ही प्राथमिक समस्या होती. केवळ 18 टक्के मुलेच त्यांच्या आईवडिलांच्या सामाजिक आयुष्याची आणि रोजच्या गरजांची काळजी घेतात, असेही यात म्हटले आहे. 

या सर्व्हेसाठी दिल्ली व परिसर, पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि कर्नाटकमधील एक हजार ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या मुलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही मुले किमान पाच वर्षे पालकांपासून वेगळी राहत आहेत.

Web Title: Older people in India are struggling to get healthy social life