ओम स्वामींने भररस्त्यात फाडले महिलेचे कपडे

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : बिग बॉसच्या दहाव्या पर्वातील स्पर्धक व वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले ओम स्वामी व त्यांचा सहकारी संतोष आनंद विरोधात एका महिलेने पोलिसांकडे भररस्त्यात कपडे फाडल्याची तक्रार दाखल केली आहे.

ओम स्वामी व संतोष आनंद यांनी 7 फेब्रुवारीला राजघाट भागात भररस्त्यात आपल्यावर हल्ला करुन कपडे फाडत शिवीगाळ केली. यावेळी मदतीसाठी आरडाओरडा करताच दोघांनी पळ काढला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, ओम स्वामी व संतोष आनंद विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सुरू असून, दोघांवर लवकरच कारवाई केली जाईल.

दरम्यान, स्वामी ओम यांना कारनाम्यांमुळे ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यात आले होतं. शिवाय, एका खासगी चॅनेलच्या स्टुडिओमध्ये त्यांना मारहाणही झाली होती.

Web Title: Om Swami booked for ripping woman's clothes off