Omar Abdullah : ओमर अब्दुल्लांनी पक्षाच्याच जिवंत खासदाराला वाहिली श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omar Abdullah

'माझ्या वडिलांच्या ऐकण्यात थोडी गफलत झाली आणि त्यांचं ऐकून मी हे ट्विट केलं.'

ओमर अब्दुल्लांनी पक्षाच्याच जिवंत खासदाराला वाहिली श्रद्धांजली

नॅशनल कॉन्फरन्सचे (National Conference) नेते आणि जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांच्याकडून एक मोठी चूक झालीय. त्यानंतर त्यांना या चुकीबद्दल माफीही मागावी लागलीय. गुरुवारी अब्दुल्ला यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार अकबर लोन (MP Akbar Lone) यांच्या निधनाची घोषणा केली. याबाबतचं ट्विटरवरून त्यांनी अकबर यांना श्रद्धांजलीही वाहिली. मात्र, अकबर यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ही चूक लक्षात आल्यानंतर अब्दुल्ला यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं आणि जाहीर माफी मागितली.

अब्दुल्ला यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, नॅशनल कॉन्फरन्सचे लोकसभा खासदार अकबर लोन यांचं श्रीनगरमध्ये अल्पशा आजारानं निधन झालंय. यानंतर काही मिनिटातच त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं आणि पुन्हा ट्विट करुन 'मी लोन साहब यांची माफी मागतो. ते लवकरात-लवकर बरे होवोत. माझ्या वडिलांच्या ऐकण्यात थोडी गफलत झाली आणि त्यांचं ऐकून मी हे ट्विट केलं. मी लोन साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागतो, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: 'जय भीम' फेम सूर्या वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनंही (Sher-e-Kashmir Institute of Medical Sciences Srinagar) लोन यांच्या प्रकृतीची माहिती देणारं निवेदन जारी केलंय. त्यांच्या मृत्यूचं वृत्त खोटं असल्याचं रुग्णालयानं म्हटलंय. खासदार अकबर लोन यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरवली जात असून ती पूर्णपणे निराधार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Web Title: Omar Abdullah Apologises For Announcing Party Mp Death Said Misunderstood He Is Recovering Jammu And Kashmir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top