'जय भीम' फेम सूर्या वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश I Actor Surya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Bhim movie

अभिनेता सूर्या याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिलेत.

'जय भीम' फेम सूर्या वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जय भीम चित्रपटामुळं (Jai Bhim movie) अफाट यश मिळवलेला अभिनेता सूर्या (Actor Surya) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिलेत. सैदापेट न्यायालयानं (Saidapet Court) चेन्नई पोलिसांना (Chennai Police) गुन्हा दाखल करण्यास सांगितलंय. चेन्नई उच्च न्यायालयानं (Chennai High Court) दिलेल्या आदेशांनुसार, अभिनेता सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका, चित्रपटाचे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल (Director TJ Gnanavel) यांच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितलंय.

सूर्या आणि त्याच्या पत्नीची मालकी असणाऱ्या कंपनीकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. समीक्षकांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली होती. पण, आता त्यात Vanniyar समुदायाचं चित्रण चुकीच्या पद्धतीनं केलं गेल्याची बाब अधोरेखित करत चित्रपटाच्या वाटेत अडथळे निर्माण केले गेले आहेत. सूर्या, त्याची पत्नी ज्योतिका आणि दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल या तिघांविरोधात रुद्र वन्नियार समाजानं (Rudra Vanniyar Community) याचिका दाखल केली होती.

हेही वाचा: रब ने बना दी जोड़ी! 36 इंची मुन्नाचं 34 इंची ममताशी झालं लग्न

Vanniyar समुदायातील काही लोकांनी न्यायालयात धाव घेत चित्रपटातील काही दृश्यांमध्ये समुदायाला वाईट पद्धतीनं दाखवण्यात आल्याचं सांगितलं. जय भीम चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वन्नियार समाजानं या चित्रपटाचा निषेध करत त्यावर बंदी घालावी, अशी मागणीही केली होती. वन्नियार समाजाचं चुकीच्या पद्धतीनं चित्रण केल्यामुळं ही दृश्ये चित्रपटातून वगळावीत. शिवाय, 5 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, अशी मागणीही समाजाकडून करण्यात आली होती.

Web Title: Fir Ordered Against Jai Bhim Actor Suriya Wife Jyothika Director Gnanavel For Defaming Vanniyar Community Chennai High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top