काश्मीरबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावं; उमर अब्दुल्लांची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय स्तरावर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काश्मीरप्रश्नी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी काश्मीरबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली. 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय स्तरावर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काश्मीरप्रश्नी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी काश्मीरबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली. 

राज्यात लागू असलेल्या कलम 370,  35-A बाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले, की हा मुद्दा देशातील संसदेत उपस्थित करण्याची गरज आहे. 35 ए वर कोणताही बदल केला जाऊ नये. राज्यात तैनात असलेले अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतेही उत्तर दिले जात नाही. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याच मुद्द्यावरून चर्चा केली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले, की आम्ही 35 ए कलम रद्द करण्याचा आमचा विचार नाही.

दरम्यान, या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीदेखील काल (शुक्रवार) राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उमर अब्दुल्ला यांनी भेट घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omar Abdullah met Governor Satyapal Singh Malik said we want parliament to answer