
दिल्ली, महाराष्ट्राने वाढवली देशाची चिंता; ब्रिटेनमध्ये १४ मृत्यू
जगभरात कोरोनाचा नवीन (coronavirus) प्रकार ओमिक्रॉनच्या (Omicron) लाटेचा प्रसार होण्याचा धोका चांगलाच वाढला आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्या १२९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तसेच आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू (14 people died in britain) झाला आहे, अशी माहिती ब्रिटनने दिली आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर सरकार कठोर निर्बंध लादण्यास मागे हटणार नाही, असे ब्रिटेनचे आरोग्य राज्यमंत्री गिलियान कीगन म्हणाले.
पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ख्रिसमसपूर्वी कोणत्याही निर्बंधांचा विचार करीत नसल्याचे सांगितले होते. सोबतच परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, नाताळानंतर सरकार कारवाई करू शकते, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, आंध्र प्रदेशामध्ये ओमिक्रॉनचा (omicron variant) रुग्ण आढळून आला आहे. देशभरात ओमिक्रॉन प्रकाराची एकूण प्रकरणे वेगाने वाढून २१४ झाली आहेत.
दिल्लीत (delhi) आतापर्यंत सर्वाधिक ५७ प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय महाराष्ट्रात (maharashtra) ५४, गुजरातमध्ये १४ आणि राजस्थानमध्ये १८ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक बोलावली आहे. ते देशभरातील परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात. याशिवाय केंद्राकडून राज्यांना काही सल्लाही दिला जाऊ शकतो. भारतात ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने बूस्टर डोसची मागणीही वाढली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना फक्त किरकोळ लक्षणांसह येतो. आम्ही ओमिक्रॉनच्या प्रकारावर लक्ष ठेवून आहोत. त्याच्या स्वरूपात काही बदल झाला तर चिंतेचा विषय होऊन जाईल. आतापर्यंत देशात सुमारे १३९ कोटी कोरोना लस देण्यात आल्या आहेत. देशात कोरोनाच्या (coronavirus) एकूण सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत सुमारे ७८ हजारांवर आली आहे. परंतु, आता ओमिक्रॉनमुळे (omicron variant) रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी बुधवारी सांगितले.