ओमिक्रॉनचे धोकादायक परिणाम; पुरुषांची चिंता वाढवेल| Serious as Delta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron Virus

ओमिक्रॉनचे धोकादायक परिणाम; पुरुषांची चिंता वाढवेल

आतापर्यंत असे समजले जात होते की कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी धोकादायक आहे. मात्र, इंपिरियल कॉलेज लंडनच्या नव्या अभ्यासातून लोकांचा हा गैरसमज दूर झाला आहे. अभ्यासात म्हटले आहे की ओमिक्रॉन डेल्टासारखा गंभीर (Serious as Delta) आहे आणि त्याचे धोकादायक परिणाम (Dangerous effects of Omicron) होऊ शकतात. ओमिक्रॉनची झपाट्याने वाढणारी प्रकरणे चिंता वाढवत आहेत.

ब्रिटननंतर (Britain) अमेरिकेतही (America) ओमिक्रॉनचा (Omicron) पहिला मृत्यू झाला आहे. त्याचवेळी भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनची १७० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी गंभीर आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, नवीन अभ्यासाने या दाव्याचे खंडन केले आहे. ब्रिटेनच्या अभ्यासानुसार ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी धोकादायक नाही.

हेही वाचा: कतरिना-विकीचे हनीमून फोटो व्हायरल; दिसतेय खूपच सुंदर

ओमिक्रॉनवर इंपीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी अभ्यास केला आहे. कोरोनाच्या इतर प्रकारांनी संक्रमित झालेल्या दोन लाख लोकांच्या तुलनेत ओमिक्रॉनची लागण झालेल्या ११,३२९ लोकांची तुलना करण्यात आली. ओमिक्रॉन हा डेल्टा पेक्षा कमी गंभीर असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे अभ्यासात म्हटले आहे. रुग्णांची लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या आधारावर ही तुलना करण्यात आली आहे.

संसर्गापासून संरक्षण कमी

ब्रिटेनमध्ये उपलब्ध लसीच्या दोन डोसनंतर ० ते २० टक्के आणि बूस्टर डोसनंतर ५५ ते ८० टक्केपर्यंत प्रभाव दिसून आला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन (Omicron) होण्याचा ५.४ पट जास्त धोका आहे. SARS-CoV-2 च्या पहिल्या प्रकारानंतर सहा महिन्यांपर्यंत दुसऱ्या संसर्गापासून ८५ टक्केपर्यंत संरक्षण मिळत होते. ओमिक्रॉनमुळे संसर्गापासून संरक्षण १९ टक्के कमी झाले आहे.

हेही वाचा: फेसबुक फ्रेंडकडून विवाहिता गर्भवती; नागपूर, जळगावात केला बलात्कार

शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम

कोरोनातून बरे झाल्यानंतर काही लोकांची शुक्राणूंची गुणवत्ता अनेक महिने खराब राहते. ३५ पुरुषांवर केलेल्या अभ्यासात असे आढळले की, कोरोनापासून बरे झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांच्या शुक्राणूंची गतिशीलता ६० टक्क्यांनी कमी झाली आणि शुक्राणूंची संख्या ३७ टक्क्यांनी कमी (Will increase mens anxiety) झाली. हा अभ्यास फर्टिलिटी ॲण्ड स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झाला आहे. कोरोना संसर्गाची तीव्रता आणि शुक्राणूंची वैशिष्ट्ये यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही. गर्भवती होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना चेतावणी दिली पाहिजे की कोरोना संसर्गानंतर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Web Title: Dangerous Effects Of Omicron Will Increase Mens Anxiety Britain America Serious As Delta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top