सावधान! Omicron चा भारतात शिरकाव; आरोग्य मंत्रालयाची माहिती

Omicron: आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांनी ही माहिती दिली.
Omicron
OmicronTeam eSakal

दिल्ली: कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे (Union Health Ministry) सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीमुळे काहीशी चिंता वाढली आहे. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनने (Omicron) भारतात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने या संबंधीत माहिती देताना सांगितले की, Omicronशी संबंधित दोन्ही रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ओमिक्रॉनने बाधित झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची ओळख पटली असून त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरां लक्ष असणार आहे. तसेच सर्व बाबींमध्ये प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.

देशातील आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. WHO ने म्हटलं आहे की, या रुग्णांच्या लक्षणांवर अभ्यास केला जातोय.

कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भारताला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमिवर सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मुद्दाची दखल घेतली असून, आज संसदेत यावर चर्चा झाली आहे. त्यातच आज हे दोन रुग्ण आढळल्याने आता चिंता वाढली आहे.

Omicron
ओमिक्रॉनचा प्रभाव : सरकारने १५ डिसेंबरची डेटलाईन पुढे ढकलली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com