Omisure kit : ओमिक्रॉनचं निदान करणाऱ्या कीटला ICMR कडून मंजूरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid test
Omisure kit : ओमिक्रॉनचं निदान करणाऱ्या कीटला ICMR कडून मंजूरी

Omisure kit : ओमिक्रॉनचं निदान करणाऱ्या कीटला ICMR कडून मंजूरी

देशात ओमिक्रॉनचं संकट वाढत असताना आता आयसीएमआरने आज ओमिशुअर या कीटला (Omisure kit) मंजूरी दिली आहे. ओमिशुअर कीटच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरीअटंची लागण झाली की नाही याचं निदान करता येणार आहे. त्यामुळे आता ओमिक्रॉनचं (Omicron) निदान करण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

हेही वाचा: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

देशात कोरोनाचा नवीन व्हेरीअंट ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 15 दिवसांत दिल्ली आणि महाराष्ट्रासह ओमिक्रॉनची प्रकरणं झपाट्यानं वाढली आहेत. त्यातच ICMR ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ICMR ने पहिल्या Omicron डिटेक्शन किटला मान्यता दिली आहे. टाटा मेडिकलने हे कीट तयार केलं आहे. या कीटचं नाव ओमिशुअर असं आहे.

दरम्यान, देशात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. भारतात सोमवारी दिवसभरात ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले. तर ११ हजार ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दिलासा देणारी बाब म्हणजे मृतांचा आकडा कमी आहे. गेल्या २४ तासात देशात १२४ जणांनी कोरोमनामुळे प्राण गमावले. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.२४ टक्के इतका आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ८३० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ६ हजार ४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुळे आजपर्यंत ४ लाख ८२ हजार १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :omicronOmicron Variant
loading image
go to top