मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

दिल्लीत ओमिक्रॉन आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.
Arvind kejriwal corona positive
Arvind kejriwal corona positiveTeam eSakal

कोरोना विषाणुच्या संसर्गाची तिसरी लाट (Covid19 Third Wave) आणि ओमिक्रॉन व्हेरीअंटच्या (Omicron) पार्श्वभूमीवर देशात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहेत. त्यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Delhi CM Arvind kejriwal corona positive)

Arvind kejriwal corona positive
PM मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल मलिक यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीत सोमवारी कोरोनाची ४,०९९ नवीन प्रकरणं नोंदवली गेली. ही संख्या रविवारच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या २४ तासांत कोविड-१९मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, संसर्गाचं प्रमाण ६.४६ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

Arvind kejriwal corona positive
"गलवानमध्ये घुसून चिन्यांचं सैनिकी संचलन, PM मोदी प्रचारात व्यस्त"

महाराष्ट्रातही अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून, २० पेक्षा जास्त आमदार आणि माजी आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यामुळे आता सर्व राजकीय मंडळी सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं दिसतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com