"RSS वाईट नाहीये"; ममता बॅनर्जींच्या विधानाने अनेकांनी उंचावल्या भुवया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata  Banerjee
"RSS वाईट नाहीये"; ममता बॅनर्जींच्या विधानाने अनेकांनी उंचावल्या भुवया

"RSS वाईट नाहीये"; ममता बॅनर्जींच्या विधानाने अनेकांनी उंचावल्या भुवया

देशात आता एका नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे ममता बॅनर्जींचं एक नवं विधान. ममता बॅनर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाईट नाही आणि तिथे असे अनेक लोक आहेत जे भाजपाला पाठिंबा देत नाहीत, असं बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: ममतांच्या RSS वरील विधानावरून राजकीय भूकंप; काँग्रेस, एमआयएमने दिली प्रतिक्रिया

मात्र आता एमआयएम, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर भाजपाला बॅनर्जींच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं प्रत्युत्तर भाजपाने दिलं आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देण्याऐवजी बंगालमधला राजकीय हिंसाचाराकडे बोट दाखवलं असून त्यात सुधारणा करण्याकडे लक्ष वेधलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे. २००३ मध्ये बॅनर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशभक्त म्हटलं होतं आणि आरएसएसनेही त्यांना दुर्गा म्हटलं होतं, असं ओवैसींनी सांगितलं.

हेही वाचा: नितीन गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यास RSS ची होती संमती; मोठं 'कारण' आलं समोर

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हे विधान केलं. त्या म्हणाल्या की आरएसएस काही वाईट नाहीय. त्यात अजूनही असे काही लोक आहेत, ज्यांना भाजपा करत असलेलं राजकारण पटत नाही. आरएसएसने या विधानाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि त्यांना राज्यातला राजकीय हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. आरएसएसचे राज्यातले सरचिटणीस जिश्नू बसू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: On Mamata Banerjees Praise For Rss What Bjp And Congress Said

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..