लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Bride broke the Marriage: यूपीच्या संतकबीरनगरमधील एका नवऱ्या मुलाला एक चूक महागात पडली आहे.
Marriage
Marriage

नवी दिल्ली- यूपीच्या संतकबीरनगरमधील एका नवऱ्या मुलाला एक चूक महागात पडली आहे. लग्नाच्या आधी त्याने आनंदात मित्रांसोबत बसून दारु प्यायला. पण, जेव्हा नवरी मुलीला याची माहिती मिळाली तेव्हा तिने थेट लग्न करण्यासच नकार दिला. नवरा मुलगा दारु प्यायला असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते.

सदर घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कुटुंबाची समजूत काढून भांडण मिटवले. पण, मुलीने लग्नाला ठाम नकार दिला. मुलीच्या कुटुंबियांनी देखील तिला साथ दिली. त्यामुळे लग्न पार न पडताच वऱ्हाड परत गेले आहे.

Marriage
Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात

सदर घटना संतकबीरनगरच्या धनघटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोतहा गावातील आहे. याठिकाणी शुक्रवारी रात्री लग्न होतं. पण, नवरा मुलगा दारुच्या नशेत लग्नस्थळी आला. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांना याची सूचना देण्यात आली होती.

माहितीनुसार, भोतहा गावाच्या रहिवाशांच्या मुलीचे आजमगड जिल्ह्यातील अतरौलियाच्या अन्तपूर बढया गावातील रहिवासी मोहित याच्याशी लग्न ठरले होते. ठरल्यानुसार वऱ्हाड आजमगडमधून भोतहा येथे आले होते. पण, नवरा मुलगा मंडपात येऊ लागला तेव्हा तो दारुच्या अमलाखाली असल्याचं समजून आलं. नवरी मुलीला हा प्रकार बिलकूल आवडला नाही. तिने लग्न न करण्याचा निर्णय घेऊन टाकला.

Marriage
Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात

पोलीस स्टेशनचे प्रभारी रजनीश राय म्हणाले की, दोन्ही कुटुंबांना शांत करण्यात आलं. शिवाय, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, शेवटी लग्न न करण्याचा निर्णय नवरी मुलीचा झाला. शेवटी, मुलीच्या कुटुंबियांनी केलेला खर्च देण्यास मुलाकडचे राजी झाले. त्यानंतर वऱ्हाड वापस गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com