esakal | बाबोव! चहाच्या एका कपाची किंमत 1000 रूपये, जाणून घ्या इतका महाग का?

बोलून बातमी शोधा

cup of tea

चहाची किंमत किती असू शकते? नॉर्मली एका कटिंगसाठी 5 ते दहा रुपये मोजले जातात. याशिवाय महाग म्हटलं तर आपण फार तर दोन अडीचशे रुपयांची कल्पना करू.

बाबोव! चहाच्या एका कपाची किंमत 1000 रूपये, जाणून घ्या इतका महाग का?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाशिवाय होत नाही. चहा पिणाऱ्यांसाठी तर वेळ काळ नसते. चहाची किंमत किती असू शकते? नॉर्मली एका कटिंगसाठी 5 ते दहा रुपये मोजले जातात. याशिवाय महाग म्हटलं तर आपण फार तर दोन अडीचशे रुपयांची कल्पना करू. पण असाही चहा आहे ज्याच्या एका कपासाठी हजार रुपये खर्च करावे लागू शकतात. कोलकात्यातील मुकंदरपूरमध्ये एक चहाचं दुकान आहे जिथं सर्वात महागडा चहा मिळतो. 

इतका महाग चहा कसा असा प्रश्न नक्कीच पडला असेल. या दुकानामध्ये जवळपास 100 प्रकारचा चहा मिळतो. या चहाची किंमत 10 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत आहे. सर्वसामान्य चहाशिवाय इथं लवेंडर टी, ओकेटी टी, वाइन टी, तुलसी जिंजर टी, हिबिस्कस टी, तीस्ता व्हॅली टी यासारखे वेगवेगळे चहा मिळतात. 

हे वाचा - वेलची चहा बनवण्याची ही आहे योग्य पद्धत; मधुमेहींसाठी हा चहा अत्यंत उपयुक्त

दुकानाचे मालक पार्थ प्रातिम गांगुली यांनी सांगितलं की, सुरुवातीला ते नोकरी करायचे. पण एक दविस त्यांनी नोकरीला राम राम केला आणि चहाचं दुकान सुरु केलं. 2014 मध्ये चहाचं लहानसं दुकान उघडलं आणि गेल्या 6 ते 7 वर्षात या दुकानाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्वात महाग असलेल्या चहाचं नाव Bo Lay असं आहे. याच्या एक किलोग्राम चहा पावडरची किंमत तब्बल तीन लाख रुपये इतकी आहे. यामुळेच एक कप चहा 1 हजार रुपयांना मिळतो.