बेळगावः विहीरीतील गाळ काढताना माती कोसळून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

एक नजर

  • बेळगाव येथील खासबाग येथे विहिरीचा गाळ काढताना माती कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
  • अविनाश पुजार (मूळ गाव - रामदुर्ग) असे मृताचे नाव तर वालेद पुजारी असे गंभीर जखमीचे नाव

बेळगाव - येथील खासबाग येथे विहिरीचा गाळ काढताना माती कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला. अविनाश पुजार (मूळ गाव - रामदुर्ग) असे मृताचे नाव आहे तर वालेद पुजारी असे गंभीर जखमीचे नाव आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,   प्रल्हाद तारीहाळकर यांच्या घराजवळील विहिरीतील गाळ काढणाचे काम सकाळी सुरू होते. पावसाळा लांबल्याने विहिर खोदाईचे काम हाती घेण्यात आले होते. सकाळी विहीरीत उतरून कामगारांनी गाळ काढण्याचा कामाला सुरु केले. काही वेळातच मोठा मातीचा ढिगारा आतमध्ये कोसळल्या. यात अविनाश पुजार या कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर वालेद पुजारी हे गंभीर जखमी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in mud excavation work in Belgaum