बिहारमध्ये 17 हजार नागरिकांमागे एक डॉक्‍टर

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

पाटणा : बिहारमध्ये 17 हजार 685 नागरिकांमागे एक डॉक्‍टर असल्याची माहिती बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी विधानसभेत दिली. राष्ट्रीय जनता दलाचे अखतरुल इस्लाम शाहीन यांनी काल प्रश्‍नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्‍न विचारला होता.

पांडे म्हणाले, की बिहारमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्‍टरांचे प्रमाण हे 1: 17,685 असे आहे, तर राष्ट्रीय स्तरावर हेच प्रमाण 1:11,097 इतके आहे. सद्यःस्थितीत राज्यात वैद्यकीय महाविद्यालयासह सहा हजार 830 डॉक्‍टर काम करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानदंडानुसार एक हजार रुग्णांमागे एक डॉक्‍टर असणे गरजेचे आहे. देशात 10 लाख नोंदणीकृत डॉक्‍टर आहेत, तर बिहारमध्ये हाच आकाडा 40 हजार 43 इतका आहे.

Web Title: One doctor behind 17 thousand citizens in Bihar