
उत्तर प्रदेश: बिहारमधील मतदार याद्यांवरुन देशभरात वातावरण तापलं आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर आली आहे.
पडताळणीदरम्यान एका ग्रामपंचायतीमध्ये एकाच घराच्या नंबरवर ६३२ मतदार नोंदणीकृत आढळले आहेत. तर, दुसऱ्या ग्रामपंचायतीत एका घराच्या नंबरवर ४,००० पेक्षा जास्त मतदार आढळले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, अधिकारी याला लिपिकाडून झालेली चूक सांगून दुरुस्त करण्याची ग्वाही देत आहेत. जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे करण्यात आलेल्या तपासणीत एकूण १,०६,५४२ बनावट मतदार आढळले आहेत.