गाय तस्करीच्या संशयावरून एकाचा मारहाणीत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

अलवार : राजस्थानमधील अलावर जिल्ह्यातील एका गावात गायी तस्करीच्या संशयावरून गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकबर खान (वय 28 वर्ष, कोलेगाव हरियाणा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अलवार : राजस्थानमधील अलावर जिल्ह्यातील एका गावात गायी तस्करीच्या संशयावरून गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकबर खान (वय 28 वर्ष, कोलेगाव हरियाणा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री अलवर जिल्ह्यातील लालवंडी गावातील जंगल भागात एक माणूस दोन गायी घेत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. तेव्हा अचानक येऊन त्यांनी खान याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत खान गंभीर जखमी झाले होते. त्यांना रामगड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असल्याचे रामगड पोलिस स्टेशनचे अधिकारी सुभाष शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून चौकशी सुरू असल्याचे ही पोलिसांनी सांगितले. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनील बेनीवाल म्हणाले, हा गायीच्या तस्करीचा प्रकार होता का? हे अजून स्पष्ट झाले नाही. आम्ही लवकरच यातील आरोपींना पडकण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 302 दुसार गुन्हा नोंद करून घेतला आहे. खान यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला असून त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या हवाली केली जाईल.
 
गेल्या वर्षी अलवर जिल्ह्यातत पेहलू खान यांचीही गायी तस्करीच्या संशयावरून जमावाने हत्या केली होती. त्यानंतर ही दुसरी घटना याच जिल्ह्यात घडली. 5 एप्रिलला अलवर जिल्ह्यातील बेहर्रा महामार्गावरील वाहनांमध्ये गायींचे वाहतूक करताना हरियाणातील पंधरा जणांना जमावाने मारहाण केली होती. यातील चार जण गंभीर जखमी झाले होते. 

सप्टेंबर महिन्यात पेहलू खान प्रकरणातील सहा आरोपींची राजस्थान पोलिसांनी निर्दोश मुक्तता केली होती. यानंतर खानच्या कुटुंबाने हत्येप्रकरणी न्यायालयीन कारवाईची मागणी करत या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यातील न्यायालयात करण्याची मागणी केली होती.

अशाच प्रकारची एक घटना नोव्हेंबर महिन्यात अलवार जिल्ह्यातील फहारी गावाजवळी गोवींद गंध येथे घडली होती. दोन मुस्लिम युवकांना हरियाणातील मेवत मधून राजस्थानातील भारतपूरला गायीची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली होती. यातील उमर खान याचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी लोकसभेत केलेल्या भाषात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांना दंगलविरोधी व बलात्कार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती. त्याच दिवशी राजस्थानमध्ये ही घटना घडली.

जमावाने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ
देशात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मार्च 2014 ते 2018 दरम्यान 45 लोकांनी जमावाच्या मारहाणीत जीव गमवला आहे. या प्रकरणांमध्ये नऊ राज्यातील किमान 217 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

Web Title: One killed in cow smuggling case