आसाममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; एकाचा मृत्यू तर तीन लाख लोकांना तोटा

One killed in floods in Assam around three lakh people affected in 11 districts
One killed in floods in Assam around three lakh people affected in 11 districts

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाच आसाम राज्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. आसामध्ये पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून पावसाचा ११ जिल्ह्यातील सुमारे तीन लाख लोकांना फटका बसला आहे. तर ब्रह्मपूत्रा नदी ओसंडून वाहत आहे. तर अतिवृष्टीमुळे आसाममधील किमान सात जिल्हे बाधित झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गोलपारा हा सर्वाधिक बाधित जिल्हा असून २.१५ लाख लोक प्रभावित झाले असून, त्यानंतर नालबारीतील २२,००० आणि नागगावमधील सुमारे ११,००० लोक आहेत. गोलपारा येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफने नऊ जणांची सुटका केली आहे, तर बाधित नागरिकांमध्ये १७२.५३ क्विंटल तांदूळ, डाळ, मीठ आणि  ८०४.४२ लिटर मोहरीचे तेल आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप केले.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या अहवालानुसार धेमाजी, लखीमपूर, नागाव, होजई, दरंग, बारपेटा, नलबारी, गोलपारा, पश्चिम कार्बी आंग्लोंग, दिब्रूगड आणि तीनसुकिया या जिल्ह्यात सध्या सुमारे दोन लाख ७२ हजार लोक पूरग्रस्त झाले आहेत. सध्या, ब्रह्मपूत्रा जोरहाटच्या निमगिघाट येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. एएसडीएमएने सांगितले की, सध्या ३२१ गावे पाण्याखाली गेली असून २,६७८ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अधिकारी पाच जिल्ह्यात ५७ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवित आहेत. ज्यात १६,७२० लोकांनी आश्रय घेतला आहे.
------------
आरबीआय बॉँड्समध्ये गुंतवणूक करायची आहे? मग ही आहे शेवटची संधी...
------------
सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
------------
...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
------------
गोलाघाट, बरपेटा, नलबारी, धामाजी, माजुली, होजई, सोनीतपूर, चिरंग, करीमगंज, नागाव, बोंगागाव, दिमा हसांव, बक्सा आणि लखीमपूर या ठिकाणी अनेक ठिकाणी तटबंदी, रस्ते, पूल या सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com