
लोकसभेत मंगळवारी एक देश एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आलं. विधेयक २६९-१९८ अशा फरकाने मंजूर झालं. आता हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, एक देश एक निवडणूक विधेयकाच्या प्रस्तावावेळी भाजपने सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. तरीही काही खासदार हे विधेयक सादर करताना अनुपस्थित राहिले. आता या खसदारांना भाजप नोटीस पाठवणार आहे.