Constitution Amendment Bill 2024 : केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आज एक देश एक निवडणूक संदर्भातील विधेयक लोकसभेत मांडणार आहेत. या विधेयकाला संविधान (१२९ दुरुस्ती) विधेयक २०२४ असं नाव देण्यात आलं आहे. त्यासाठी भाजपाने खासदारांना व्हीपही जारी केला आहे. हे विधेयक सादर होताना सर्व खासदारांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे, असं व्हीपमध्ये म्हटलं आहे.