
एक देश एक निवडणूक विधेयक मंजुरीसाठी संयुक्त संसदीय समितीसमोर पाठवण्यात आलं आहे. यासाठी ३१ सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली असून यात अनुराग ठाकुर, प्रियांका गांधी यांच्यासह इतर खासदारांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष भाजप खासदार पीपी चौधरी हे असतील. एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. आता हे मंजुरीसाठी जेपीसीकडे पाठवलं आहे.