
ONE PLUS चे जगातील सर्वात मोठे शोरूम बेंगलोर मध्ये उघडणार
वन प्लसने (ONE PLUS) जगातील सर्वांत मोठे एक्सपीरिएंस स्टोअर बेंगलुरुमध्ये चालू केले आहे. ONE PLUS BOULEVARD असे या शोरूमचे नाव आहे. ब्रिगेड रोडला भारतातील सिलिकॉन व्हॅली नावाने ओळखलं जातं. रोडच्या परिसरातच या शोरुमची उभारणी करण्यात आली आहे.
ONE PLUS हा एक महत्वाचा ब्रॉड आहे. वन प्लसच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. चांगल्या सुविधा आणि जलद सर्विस या कारणांमुळे या प्रोडक्टला खूप मागणी आहे. या प्रोडक्टला तरुण वर्गाकडून जास्त प्रतिसाद आहे.
हेही वाचा: 'देशाची सत्ता तुमच्या हाती घ्या'; पुतिन यांनी युक्रेन लष्करालाच दिला सल्ला
नव्याने उभारण्यात आलेलं हे वन प्लसचे स्टोअर दोन मजली असून 39,000 स्केअर फुट एवढा त्याचा स्पेस आहे. सोबत एंट्री आणि एग्जिटचे रस्ते आहेत. स्टोअरला अशा प्रकारे डिजाइन केलंय की, ग्राहकांना चांगल्या प्रकारे अनुभव देता येईल. आलेले ग्राहक प्रोडक्टसोबत जोडली जातील, असा विचार करुनच एकूण शोरुमची रचना आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे.
ONE PLUS BOULEVARD च्या नावावरुनच आपल्याला लक्षात येतं की, यामध्ये नॅचरल आणि अर्थी (Earthy) इलेमेंट्स ठेवण्यात आले आहेत. सोबत देशभरातील आर्टीस्टचे घेतले गेलेले आणि सिरेमिक आर्टवर्क स्टोरमध्ये ठेवलेली आहेत.
ग्राउंड फ्लोअरला मोठे एक्सपीरिएंस सेंटर आहे. त्याठिकांणी ग्राहक ONE PLUS चे सर्व प्रोडक्टला थेट टच आणि फिल करू शकतील. सोबत एक कम्युनिटी झोन आहे. कम्युनिटी लॉन्ज, गेमिंग झोन आणि इवेंट होस्ट करण्यासाठी ऑडिटेरियम आहे. नविन प्रोडक्ट ओपन आणि सेट करू शकतील यासाठी सिग्नेचर कॉफी एक्सपेरिअंस झोन आणि वेगळा अनबॉक्सिंग झोनही आहे.
Web Title: One Plus Big Showroom In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..