'देशाची सत्ता तुमच्या हाती घ्या'; पुतिन यांनी युक्रेन लष्करालाच दिला सल्ला

putin
putinSakal

रशिया-युक्रेन युद्धाचा आज दुसरा दिवस असून परिस्थिती अद्याप चिघळलेलीच आहे. तरीही आज रशियाने चर्चेसाठी आपले एक शिष्टमंडळ युक्रेनला पाठवण्याची तयारी दाखवली आहे. काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना फोन केला होता तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज फोन केला होता. दुसरीकडे आज तालिबाननेही रशियाला शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, इतकं असूनही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा स्वभाव काही माघार घेण्याचा दिसत नाहीये. आता त्यांनी युक्रेनच्या लष्करालाच एक सल्ला दिला आहे.

putin
मला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही म्हणून टीका झाली: उद्धव ठाकरे

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनियन लष्कराला म्हटलंय की, 'सत्ता तुमच्या हातात घ्या.' नाझीपासून देशाला वाचवण्यासाठी सत्ता हाती घ्या. युक्रेनमध्ये सत्तांतर झालं तर वाटाघाटी करणं सोपं जाईल, असं पुतिन यांनी म्हटलंय. एकप्रकारे युक्रेनच्या सैन्याचं खच्चीकरण करण्याचा पुतिन यांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे युरोपीय महासंघाच्या (ईयू) नेत्यांनी तब्बल सहा तास विचारमंथन केल्यानंतर रशियावर दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

putin
Ukraine-Russia War: PM मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोन

महासंघाच्या अध्यक्षांनी रशियावर टीका केली असून पुतीन यांनी युक्रेनवरील आक्रमणासाठी खोटी कारणे पुढे केली असून त्यांचे दावे देखील धादांत खोटारडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. युरोपीय महासंघाचे अध्यक्ष उर्सुला व्होन डेर लेयेन म्हणाले की, ‘‘ आम्ही रशियन बॅंकींग प्रणालीवर हल्ला करू त्यानंतर सरकारी मालकीच्या तेल कंपन्या लक्ष्य केल्या जातील. रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला देखील लक्ष्य करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला. या निर्बंधांमुळे रशियाला त्यांच्या तेलशुद्धीकरण कारखान्यांमध्ये तांत्रिक सुधारणा घडवून आणता येणार नाहीत.’’

जर्मन सरकारकडून विरोध
जर्मनीने देखील रशियाच्या हल्ल्याचा निर्णय अतार्किक ठरविला असून त्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल असे नमूद केले. पाश्चिमात्य देश हे रशियाकडून कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांची खरेदी थांबवतील असा इशारा जर्मनीकडून देण्यात आला. सध्या रशिया या माध्यमातूनच सर्वाधिक पैसा कमावतो. जर्मन सरकारमधील सर्वाधिक शक्तिशाली मंत्री रॉबर्ट हॅबेक म्हणाले की,‘‘ या संघर्षामुळे इतर देश रशियाकडून ऊर्जा आणि इंधन खरेदी थांबवतील आणि त्यांच्या देशात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. आता पाश्चिमात्य देश हे पूर्णपणे रशियापासून दुरावतील. आम्ही आमच्या ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया अधिक विविधांगी करण्याचा प्रयत्न करू. रशियाचे तेल आणि नैसर्गिक वायू यांची आम्ही खरेदी करणार नाहीत.’’ सध्या जर्मनीला अर्ध्यापेक्षा अधिक नैसर्गिक वायू आणि कोळसा रशियाकडून मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com