पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

वृत्तसंस्था
Tuesday, 2 June 2020

पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणाऱ्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याकडूनही सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणाऱ्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय त्यांच्या काही चौक्या देखील उद्धवस्त करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील त्रालमधील सिमोह परिसरात ही घटना घडली आहे. भारतीय सेनेचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या अगोदर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळापासून रविवार सकाळ पर्यंत सीमेवरील चौक्यांसह रहिवासी भागांना लक्ष करत गोळीबार केला होता. 
------------
धक्कादायक ! कोरोनानंतर इबोलाचा नव्याने उद्रेक; चार जणांचा मृत्यू
------------

कीरनीपासून बालाकोटपर्यंत शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांब नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरपाती करणे सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात मेंढर सेक्टरमध्ये काही जनावरं देखील जखमी झाले तर घरांचेही नुकसान झाले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One terrorist killed in an encounter that has begun at Saimoh area of Tral, Awantipora.