शबरीमला दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू!

अजय कुमार
Friday, 15 November 2019

गेल्या वर्षी महिलांना मंदिरात जाऊ देण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे शबरीमला देवस्वमला देणगी रूपातील कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे.

तिरुअनंतपुरम : शबरीमलावरील अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश दिला तर त्याचे परिणाम भयंकर होतील, असा इशारा केरळमधील भाजपतर्फे दिला जात असला, तरी मंदिर प्रवेशासाठी 36 महिलांनी नोंदणी केली आहे. शबरीमलाच्या संकेतस्थळावरून त्यांनी दर्शनासाठी नोंदणी केली आहे. 

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे नास्तिक असून, ते पूजा करीत नाहीत अथवा मंदिरातही जात नाहीत; पण शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. महिलांना प्रवेशापासून रोखण्यासंबंधी निर्णय घेण्यावर सरकारची द्विधा मनःस्थिती आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शबरीमला मंदिर शनिवारी (ता. 16) उघडणार असून महिलांच्या प्रवेशावरून तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. प्रवेशासंबंधी दाखल झालेल्या फेरविचार याचिका फेटाळून लावण्यासाठी न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी केरळ सरकारने सरकारी वकिलाची नेमणूक केली असून, त्यासाठी 50 लाख रुपये मोजले आहेत. 'नवोधनम' या सुधारणावादी चळवळीद्वारे जनजागृती केली जात आहे. 

'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असे म्हणणार नाही, पण... : संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शबरीमला वाद मोठ्या पीठाकडे गुरुवारी (ता. 14) सोपविला. त्यानंतर केरळ सरकारने सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. यात महिला पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी यंदा हुंडीतच पैसे टाकावेत, अशी विनंती देवस्वमच्या बैठकीत भाविकांना करण्यात आली.

गेल्या वर्षी महिलांना मंदिरात जाऊ देण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे शबरीमला देवस्वमला देणगी रूपातील कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. या पैशांचा उपयोग केरळमधील अन्य मंदिरांच्या मदतीसाठी केला जातो. 

- #Prithviraj : ही 'मिस वर्ल्ड' साकारणार 'राणी संयोगिता'ची भूमिका!

तृप्ती देसाई घेणार दर्शन 

शबरीमला मंदिराला यंदा भेट देणार असल्याचे 'भूमाता ब्रिगेड'च्या तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी त्या कोची विमानतळावर पोचल्या होत्या; पण त्यांना तेथूनच परत जावे लागले. केरळमधील महिला कार्यकर्त्या आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थक बिंदू आणि कनकदुर्गा यांनीही अय्यप्पांच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले. राज्यातील डाव्या आघडीच्या सरकारच्या धर्मविरोधी भूमिकेमुळे शबरीमला तीर्थक्षेत्री या वेळीही तणाव राहणार आहे.

- न्यायाधीशांचे स्वातंत्र्य मौनातच : सरन्यायाधीश गोगोई

दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई हे स्वतः पूजा करीत नाहीत अथवा मंदिरातही जात नाहीत. देवावरील श्रद्धा आणि मंदिरे हे सर्व मिथ्या आहे, त्यामुळेच ते दर्शनासाठी जात नाहीत, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online booking started for women entry in Sabarimala