#Prithviraj : ही 'मिस वर्ल्ड' साकारणार 'राणी संयोगिता'ची भूमिका!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अक्षय कुमार यामध्ये पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार असून चंद्रप्रकाश द्विवेदी हे या ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. यशराज प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

जगातील सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा अशी ओळख असलेल्या 'मिस वर्ल्ड' या स्पर्धेची 2017 ची विजेती मानुषी छिल्लर तुम्हाला आठवते का?

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'मिस वर्ल्ड'चा किताब पटकावल्यानंतर तिला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या, ती अमुक-अमुक दिग्दर्शकाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर ती जणू काही गायबच झाली होती. मात्र, आज अचानक ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. 

- करीना, कियारा डिसेंबरमध्ये देणार 'गुड न्यूज'

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आज ट्विटवर एक पोस्ट शेअर केल्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला. पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

- लग्नाआधीच 'ही' अभिनेत्री आहे प्रेग्नंट?

अक्षय कुमार यामध्ये पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार असून चंद्रप्रकाश द्विवेदी हे या ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. यशराज प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे. पुढील वर्षी दिवाळीत पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

- अग्निहोत्र 2 : कर्करोगावर मात करत शरद पोंक्षे यांच दमदार पुनरागमन, पाहा व्हिडीओ !

मानुषी या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांची पत्नी राणी संयोगिता यांची भूमिका साकारणार आहे. यशराज बॅनर सोबत काम करण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजते. आणि करिअरच्या सुरवातीलाच राणी संयोगिता यांची भूमिका साकारायला मिळत असल्याने मी याला मोठी जबाबदारी समजते. या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. त्यासाठी संदर्भ साहित्याचे वाचनही करत असल्याची माहिती मानुषीने माध्यमांशी बोलताना दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miss World 2017 Manushi Chillar to star opposite Akshay Kumar in Prithviraj movie