ऑस्ट्रेलिया: भारताने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia

ऑस्ट्रेलिया: भारताने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

sakal_logo
By
प्रणाली मोरे

भारत सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या कांस्यापासून बनवलेल्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियामध्ये तोडफोड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हे कृत्या चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेमुळे भारतीय आणि भारतासह ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

हेही वाचा: ‘एस-४००’ हे क्षेपणास्त्र देण्याची प्रक्रिया सुरू

पंतप्रधान मॉरिसन यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे दूत राजकुमार आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांसमवेत रावविले येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर काही तासांनंतरच ही घटना घडली. अनादराची ही पातळी अत्यंत लज्जास्पद आणि अत्यंत निराशाजनक आहे असे म्हणत पंतप्रधान मॉरिसन यांनी या घटनेचा निषेध केला. जगातील सर्वात यशस्वी बहुसांस्कृतिक आणि स्थलांतरित राष्ट्र असलेल्या देशात सांस्कृतिक स्मारकांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत असे म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला.

हेही वाचा: ‘अल जझिरा’चा ब्युरो चीफ; सुदानी सैन्याच्या अटकेत

दरम्यान, व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 5.30 ते शनिवारी संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान अज्ञात लोकांनी पॉवर टूलचा वापर करत पुतळ्याचा वरचा भाग तोडण्याचा प्रयत्न केला.

loading image
go to top