Dream11 users worried after Online Gaming Bill 2025 : केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करत मोठा निर्णय घेतला आहे. या विधेयकामुळे पैशाची थेट देवाणघेवाण करणारे ऑनलाइन गेमिंग ॲप बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या गेम्सच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक थांबेल, असा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या निर्णयाचा सर्वाधिक फटका ड्रीम-11 सारख्या अॅपला बसणार आहे.