दिल्लीत मिळणार फक्त 'या' दोन प्रकारचे फटाके

दिल्लीत मिळणार फक्त 'या' दोन प्रकारचे फटाके

नवी दिल्ली : भारताची राजधानी असणारी दिल्ली तिथल्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यात आता दिवाळी काही दिवसांवर आली असल्याने दिल्ली प्रशासन आणि पर्यावरण विभाग आणखी चिंतेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने दिल्ली केवळ फुलबाजा आणि पाऊस याप्रकारचेच फटाके विकण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. हे फटाके 'ग्रीन क्रॅकर्स' असे ओळखले जात असून आतपर्यंत केवळ फुलबाजा आणि पाऊस हेच ग्रीन क्रॅकर्स तयार करण्यात आले आहेत. 

काय आहेत ग्रीन क्रॅकर्स

ग्रीन क्रॅकर्स हे साध्या फटाक्याप्रमाणेच असले तरी देखील हे तयार करताना अशा प्रकारे केले जातात जेणेकरुन यांच्या पासून होणारे वायू प्रदूषण हे इतर फटाक्यांच्या तुलनेत 30 टक्क्यापर्यंत कमी असते.

दरम्यान आतापर्यंत संपूर्ण देशात केवळ 30 फटाके उत्पादकांनाच हे फटाके तयार कऱण्याचा परवाना मिळाला आहे. जो देखील काही दिवसांपूर्वीच देण्यात आला, त्यामुळे आतापर्यंत अत्यंत कमी फटाके तयार झाले असल्यानेच यंदा दिल्लीकरांना केवळ फुलबाजा आणि पाऊसांवरच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com