''कठीण परिस्थितीतही युक्रेनमधून 22 हजारांहून अधिक विद्यार्थांना भारतात आणले''

कठीण परिस्थितीत अतिशय अचूक पार पडलेले हे एक मोठे ऑपरेशन होते असेही ते म्हणाले.
S. Jaishankar
S. JaishankarSakal

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील युद्ध आज सलग 20 व्या दिवशीही सुरूच आहे. कठीण परिस्थितीतही आम्ही 22500 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात परत आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar) यांनी राज्यसभेत दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चर्चा केली जात होती, यासर्वामध्ये भारतीय नागरिकांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांना तेथून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे होते आणि त्यासाठीच ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आल्याचे जयशंकर यांनी सांगितले. कठीण परिस्थितीत अतिशय अचूक पार पडलेले हे एक मोठे ऑपरेशन होते असेही ते म्हणाले. (S Jayshankar On Ukraine Evacuation In Rajyasabha)

युक्रेनमधील परिस्थिती बिघडली तेव्हा 18000 हून अधिक भारतीय विद्यार्थी तेथे अडकले होते, ही बाब लक्षात घेऊन भारतासह युक्रेनमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारील देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भारतातून अधिकाऱ्यांना युक्रेन शेजारील देशांच्या सीमेवर पाठवण्यात आल्याची माहिती एस. जयशंकर यांनी यावेळी दिली.

S. Jaishankar
पिस्तुलाशी खेळ पडला महागात; गोळी लागून आईचा मृत्यू

ऑपरेशन गंगा (Operation Ganga) ज्या वेळी सुरू होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सतत बैठका घेत होते. या दरम्यान सर्व मंत्रालयांचा सपोर्ट मिळाला आहे. जेव्हा युक्रेनमध्ये परिस्थिती खराब होण्यात सुरूवात झाली त्यावेळी जानेवारी 2022 मध्ये भारतीयांचे रजिस्ट्रेशन करण्यास सुरूवात केल्याचेही जयशंकर यांनी यावेळी राज्यसभेत सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com