नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव' दरम्यान (Operation Mahadev) ठार मारलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक ताहिर हबीबच्या अंत्ययात्रेचे फोटो आणि व्हिडिओ आता पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून समोर आले आहेत. या अंत्ययात्रेचे आयोजन काई गल्ला गावात करण्यात आले होते.