
भारतीय तटरक्षक दलाने गुजरात एटीएसच्या सहकार्याने समुद्रात गुप्तचर माहितीवर आधारित अंमली पदार्थ विरोधी संयुक्त मोहीम राबवली. या संयुक्त कारवाईत, सुमारे १,८०० कोटी रुपयांचे ३०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थ मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय आहे.