Masood Azhar Family Members Killed: पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली आहे. यावेळी दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात ८० ते ९० दहशतवादी ठार झाल्याचं सांगणयात येत आहे. अशातच या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबांतील सदस्यांचा मृत्यू झाल्याचीदेखील माहिती पुढे आली आहे.