
पंजाब: भारताने पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर सीमेवर खूप तणाव आहे. पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार करत आहे. पाकिस्तानच्या संभाव्य कारवाईबद्दल भारत खूप सतर्क आहे आणि यासाठी देशभरात विशेषकरुन पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती राज्यांमध्ये मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सराव आयोजित केले जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पंजाबमध्ये अनेक ठिकाणी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सराव करण्यात आला.