Pune fighter jets midnight flight : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता बदला घेतला आहे. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तान तसेच पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केली आहे. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्धस्त झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर पुण्यातूनही लढाऊ विमानांनी उड्डाण घेतल्याचं पुढे आलं आहे. मध्यरात्री पुण्यातून हवाई दलाची काही विमाने हवेत झेपावली असून हल्ला संपेपर्यंत या विमानांनी पुणे, मुंबईच्या आकाशात घिरट्या घातल्याची माहिती आहे.