Six Enemy Aircraft Downed Including AWACS Spy Plane : भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात महत्त्वाचं विधान करत पाकिस्तानला दिलेला मोठा धक्का उघड केला आहे. त्यांच्या मते, या ऑपरेशनदरम्यान भारतीय हवाई दलानं एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली. यामध्ये पाच लढाऊ विमानं आणि एक गुप्तचर विमान AWACS (Airborne Warning and Control System) चा समावेश आहे.