
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले दहशतवाद्यांच्या ९ तळांवर मंगळवारी रात्री उशिरा हल्ले केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जवळपास अर्धा तास मुजफ्फराबाद, मुरीदके सह ९ तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर आता त्या ठिकाणांचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. यात हल्ल्या आधीची स्थिती आणि हल्ल्यानंतरची परिस्थिती दिसून येत आहे.