Shubham Dwivedi’s wife thanks PM Modi after India's Operation Sindoor : भारताने रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात ८० ते ९० दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या या हल्ल्यानंतर पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी या हल्ल्याचं स्वागत केलं आहे.