LeT Moves Terror Camps from PoK
esakal
After Operation Sindoor, Lashkar-e-Taiba shifts training camps from PoK : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले असून, त्यांनी आपले ट्रेनिंग सेंटर भारत-पाकिस्तान सीमेपासून दूर हलवण्यास सुरुवात केली आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांनी त्यांचे ट्रेनिंग कॅम्प पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून अफगाणिस्तानच्या सीमेकडे हलवले असल्याची माहिती समोर आली आहे.