
भारताने पाकिस्तानवर मध्यरात्री 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन पहलगाम हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता जगभरातून प्रतिक्रिया येत आहे.अमेरिकेकडूनही पाकिस्तानला इशारा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचा दावा व्हाईट हाऊसच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे.