Rajasthan : स्वातंत्र्यदिनी सरकारी शाळेत अफूचे वाटप, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळेचा परिसर स्पष्टपणे दिसून येत आहे.
School
Schoolsakal
Updated on

Opium Served In Rajasthan Barmer : राजस्थानमधील एका सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनी अफूचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा धक्कादायक प्रकार राजस्थामधील बाडमेर जिल्ह्यातील गुडामलानी उपविभागातील रावली नाडी येथील शाळेतील आहे.

School
Vande Mataram: वंदे मातरम् म्हणण्यावर मुनगंटीवार आग्रही, सांगितला अर्थ...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळेचा परिसर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोमवारी शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी शाळेत सतरंजी टाकून बसले. त्यानंतर या सर्वांना अफू देण्यात आले. शाळेत अफू दिल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. घटनेची माहिती मिळाली त्यानंतर संबंधित अधिकारी शाळेत गेले असता तोपर्यंत हे सर्वजण निघून गेले होते.

School
Bihar : नितीश मंत्रिमंडळाचा आज विस्तार; जाणून घ्या, कसं असेल जातीचं समीकरण

CBEEO ओमप्रकाश विश्नोई म्हणाले की, व्हिडिओ समोर आल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. मंगळवारी सकाळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे जबाब घेण्यात येणार आहेत. गुडमलानी एसडीएमकडे अहवाल सादर करण्यात येणार आहेत. व्हायरल होणाऱया या व्हिडिओमध्ये गावकरी शाळेच्या व्हरांड्यावर बसलेले दिसत आहेत. तर, एक व्यक्ती खुर्चीवर बसली आहे, जी पैशाच्या व्यवहाराचा हिशेब करत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षकही दिसत असून, जो रजिस्टरमध्ये बसलेल्या लोकांच्या सह्या घेत आहे. दुसरीकडे मदतीच्या रकमेतून अफू आणल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com