Vande Mataram: वंदे मातरम् म्हणण्यावर मुनगंटीवार आग्रही, सांगितला अर्थ...

सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम बोलणार
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwaresakal

Vande Mataram: सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नवा फर्मान काढला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम बोलणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावर त्यांचे म्हणणे आहे की हॅलोसारखे शब्द परकीय आहेत. म्हणून, हे शब्द टाकून देणे आवश्यक आहे. ते म्हणतात की वंदे मातरम् हा केवळ एक शब्द नसून प्रत्येक भारतीयाची भावना आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, हॅलो हा परदेशी शब्द आहे. या प्रकरणात ते सोडून देणे आवश्यक आहे. वंदे मातरम् हा केवळ एक शब्द नसून प्रत्येक भारतीयाची भावना आहे यावर त्यांनी भर दिला. अशा परिस्थितीत ते बोलण्यात अजिबात संकोच नसावा असेही ते पुढे म्हणाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमच्या विभागाने 'इंग्रजांकडून किंवा परदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, असं अभियान सुरू केलं आहे. मात्र वंदे मातरम् ऐवजी कुणी राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा तोडीचा शब्द वापरत असेल, तर त्याला आम्ही विरोध करणार नाही. रझा अकादमीसाठी हॅलो शब्द देशभक्तीला प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित होत नाही. त्यासंबंधी आम्ही असा कोणताही कायदा केलेला नाही,' असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Sudhir Mungantiwar
सरकारी कार्यालयात आता 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम्'; नव्या सांस्कृतीक मंत्र्यांचा निर्णय

त्यांच्या या आवाहनामुळे वाद निर्माण झाला. विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर आता त्यांनी यावरुन युटर्न घेतला आहे. ''हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् हाच शब्द वापरावा, असं मी म्हणलेलं नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com