भाजपचा निवडणूक प्रचार जात, धर्मावर आधारित: काँग्रेस

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

नवी दिल्ली : निवडणूकीचा प्रचार जात आणि धर्माच्या आधारे करू नये, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत भारतीय जनता पक्षाचे नेते साक्षी महाराज यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसने भाजपवर जात-धर्माच्या नावावर प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : निवडणूकीचा प्रचार जात आणि धर्माच्या आधारे करू नये, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत भारतीय जनता पक्षाचे नेते साक्षी महाराज यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसने भाजपवर जात-धर्माच्या नावावर प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे.

चार बायका आणि चाळीस मुले असलेले नागरिकच भारताच्या लोकसंख्या वाढीस जबाबदार असल्याचे वक्तव्य साक्षी महाराज यांनी आज (शनिवार) केले. लोकसंख्यावाढीला हिंदू जबाबदार नसल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजावर अंगुलीनिर्देश करत देशातील एकच समुदाय लोकसंख्यावाढीला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे नेते के. सी. मित्तल म्हणाले, "साक्षी महाराज यांचे वक्तव्य जात आणि धर्मावर आधारित असून ते आक्षेपार्ह आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आचार संहितेचा भंग झाला आहे. मला असे वाटते की त्यांच्यावर कारवाई व्हावी. हा विषय घेऊन आम्ही नक्कीच निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात नुकत्याच दिलेल्या निर्णयाबाबत आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की, जाती आणि धर्माच्या आधारावर प्रचार करण्यात येऊ नये, याबाबत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि प्रभाग अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात.'

"भारतीय जनता पक्षा सध्या जात-धर्मावर आधारित प्रचार करत आहे. तोच त्यांचा अजेंडा आहे. त्यापलिकडे ते जाऊच शकत नाहीत. हे थांबायला हवे. आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मनिरपेक्षच आहोत. आता सर्वोच्च न्यायालयानेही याबाबतचे आदेश दिले आहेत.' असेही मित्तल पुढे म्हणाले.

Web Title: Opposition corners BJP over Sakshi Maharaj's 'Muslim' comment