esakal | राजस्थानच्या राजकीय घडामोडीविषयी महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थानच्या राजकीय घडामोडीविषयी महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणाले...

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. दरेकर आज (बुधवार) कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सत्तेचे राजकारण भाजपला करण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळे जनतेचा मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे असेही त्यांनी नमूद केले.

राजस्थानच्या राजकीय घडामोडीविषयी महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणाले...

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत. देशाचा इतिहास त्यांनी तपासावा. कॉंग्रेसनेच सत्तेचा सातत्याने गैरवापर केला आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून जनता पक्षाशी हातमिळवणी करून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे अशा गोष्टी करण्याचा नैतिक अधिकार कॉंग्रेसला नाही, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवार यांच्यावर केला. सत्तेचे राजकारण करायची भाजपला आवश्‍यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा
 
कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. दरेकर आज (बुधवार) कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ते बोलत होते. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, सहकार सेलचे सहसंयोजक शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते. राजस्थानमधील राजकीय घडामोडीवर शरद पवार यांनी केलेल्या विधानसंदर्भात श्री. दरेकर म्हणाले, ""शरद पवार हे मोठे नेते आहेत. देशाचा इतिहास त्यांनी तपासून पाहावा. कॉंग्रेसने सत्तेचा सातत्याने गैरवापर केला आहे. चरणसिंग, इंद्रकुमार गुजराल, व्ही. पी. सिंग, देवेगौडा यांचे सरकार कोणी पाडले? ज्या पक्षाचा इतिहासच सत्तेचा दबाव ठेऊन राजकारण करण्याचा आहे, त्यांनी या गोष्टी सांगू नयेत. सत्तेचे राजकारण भाजपला करण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळे जनतेचा मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे.

काेराेनाबाधित रुग्णामागे दिवसाला इतके रुपये खर्च हाेताहेत, साताऱ्याला 13 कोटींची गरज 

राजस्थानमधील राजकीय घडामोडीला भाजप जबाबदार नसून कॉंग्रेसअंतर्गत विसंवाद त्याला जबाबदार आहे. कॉंग्रेसमध्ये क्षमतेला किंमत नाही, गुणवत्तेला किंमत नाही. त्यामुळे तरुण नेतृत्व विचलित झाले आहे. तुम्हाला अजिबात काय कळले नाही तरी चालेल, मात्र गांधी परिवाराशी रॉयल्टी पाहिजे.'' 

संपादन - संजय शिंदे

यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन केला घाेषित