Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवन इथं पार पडणार आहे.
Narendra Modi
Narendra ModiEsakal

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवन इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शेजारील देशांच्या प्रमुखांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. पण अद्याप विरोधकांना या सोहळ्यासाठीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरुन काँग्रसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीका केली आहे. (Opposition not invited to Narendra Modi swearing in ceremoney Jairam Ramesh says Modi as one third of Prime Minister)

रमेश म्हणाले, "स्वयंघोषित विश्वगुरु आता स्वयंघोषित विश्वबंधू झालेत. त्यांनी आपल्या शपथविधीसाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांना प्राधान्य दिलं आहे. पण अद्याप आम्हाला कुठल्याही स्वरुपाचं निमंत्रण आलेलं नाही. पण मला असं म्हणावसं वाटतंय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची खूपच फरफट झाली त्यांचं वैयक्तिक नुकसान झालं आहे. तसंच राजकीय हार आणि मानसिक पिछेहाट झाली आहे. आम्हाला जरी उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं नसलं तरी त्याला उपस्थित राहण्यासारखं काय आहे?"

Narendra Modi
Janhavi Marathe: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; इगो मीडियाची माजी संचालक जान्हवी मराठेला गोव्यातून अटक

त्यामुळं आता नरेंद्र मोदी हे एक तृतीयांश पंतप्रधान आहेत. कारण चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्याशिवाय ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत. २४० जागांसह ते पंतप्रधान होत आहेत. पण जवाहरलाल नेहरु हे सलग तीन वेळेस पंतप्रधान झाले पण दोन तृतीयांश बहुमतानं झाले होते आणि शेवटपर्यंत ते लोकशाहीवादी राहिले, असा टोलाही यावेळी रमेश यांनी मोदींना लगावला.

Narendra Modi
Pune Rain: पुण्यात मॉन्सूनला जोरदार सुरुवात; विजांच्या कडकडाटांसह पावसाची बॅटिंग, पुढील ३ तास सावधानतेचा इशारा

दरम्यान, मला वाटतं उद्याच्या शपथविधीला कुठलीही वैधता नाही. कारण त्यांचे मित्रपक्ष हे त्यांच्यासोबत राहतील की नाही हे सांगू शकत नाही. त्यांच्या मागण्या काय असतील हे सांगू शकत नाही. पण आता नायडूंच्या आंध्र प्रदेशात मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण मिळतं आहे आणि मोदींनी तर कर्नाटकातील मुस्लिमांच्या आरक्षणावर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळं आता त्यांच्या भूमिकेत विरोधाभास दिसणार आहे. मोदींचा डीएनए हा हुकुमशहाचा आहे. आघाडीचं सरकार चालवण्याची त्यांच्यात क्षमता नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com